माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती कार्यक्रमात नगरसेविका, मुख्याधिकाऱ्यांत शाब्दिक खडाजंगी

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर नगरपरिषदेत शासनाच्या आदेशानुसार सकाळी १० वाजता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

मात्र, नगरसेवक व नगरसेविका वेळेवर उपस्थित असतानाही नगर परिषदेचे अधिकारी व काही कर्मचारी एक तास उशिराने उपस्थित झाल्याने कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यावेळी नगरसेविका सुवर्णा जाधव आणि मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्यात कार्यक्रमाच्या नियोजनावरून शाब्दिक खडाजंगी  झाल्याची माहिती आहे.

शासकीय कार्यक्रमासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती अपेक्षित असताना अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने उपस्थित नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. वारंवार संपर्क साधल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमस्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक संतोष अंबिलवादे, फैसल चाऊस, राकेश कळसकर, योगेश पाटील, सुरेश नेमाडे, विशाल गायकवाड, शरद दारूंटे आदी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकारामुळे जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत असून , नगरपरिषद प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले.  या प्रकाराची गंगापूर शहरात चर्चा सुरू आहे. 

शासनाच्या आदेशानुसार सकाळी १० वाजता जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरसेवक व नगरसेविका वेळेवर उपस्थित होते. मात्र नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तब्बल एक तास गैरहजर होते. वारंवार संपर्क साधल्यानंतर ते उपस्थित झाले. लोकनेत्यांच्या जयंतीसारख्या शासकीय कार्यक्रमाबाबत अशा प्रकारचा निष्काळजीपणा आणि नियोजनाचा अभाव ही अत्यंत खेदजनक बाब आहे. 


- सुवर्णा संजय जाधव, नगरसेविका

हा कार्यक्रम स्टुडिओ ग्राउंडवर मुख्यमंत्री व अजित दादा यांच्या जयंतीनिमित्त यांचे कार्यक्रमचे तयारी करत होतो. त्याच्यामुळे नगरपालिका येथे कार्यक्रम होणार असल्याची मला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. नगराध्यक्षांकडून मला कार्यक्रमाबाबत माहिती मिळालेली नव्हती. त्यामुळे मी व स्टुडिओ ग्राउंडवर नगर परिषदेचे कर्मचारी ग्राउंडवर कार्यक्रमाच्या तयारीत होतो.

- संतोष आगळे, न. प. मुख्याधिकारी गंगापूर